Pune : 16 वर्षाच्या मुलीचं 28 वर्षीय सागरशी जुळलं, लिव्ह इन रिलेशनशीपमध्येच त्यानं चारित्र्यावर संशय घेऊन तिला संपवलं, गळा आवळून खून केल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील पेरणे फाटा परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीची तरुणाने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, तो हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला आणि खुनाची माहिती दिली आहे.

सागर सारधर वानखेडे (वय 28, पेरणे फाटा, मूळ, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. तर यात अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे, असे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वय 16 वर्ष 6 महिने आहे. तर आरोपी हा 28 वर्षांचा आहे. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. तर मुलगी मुंबईची आहे. आरोपी हा येथील एका तूप बनविणाऱ्या कंपनीत काम करतो. ते दोघे एकत्र राहत होते. मात्र, त्यांची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्याचा तपास सुरू आहे. नेमकी त्यांची ओळख कशी झाली आणि ते एकत्र राहत होते, हे तपासले जात आहे. मात्र, ते गेल्या काही दिवसापासून लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते, असे समजते. तरुणाला तरुणीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तरुणीची गळा आवळून हत्या केली, असल्याचे प्राथमिक माहिती आहे.