मोबाईलमध्ये रेकॉडिंग करत 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एका सोळा वर्षाच्या मुलाने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने पबजी गेम आमि टिक टॉक व्हिडीओ पाहण्यास कुटूंबियानी विरोध केल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा बिबवेवाडीत त्याच्या आजीसोबत राहतो. त्याला वडील नाहीत. तर, आई मुंबईत असते. त्या मुलास मोबाईलचे व्यसन होते. त्यामुळे त्याने नववीनंतर शाळा देखील सोडली होती. तो सतत मोबाईल टिकटॉक व्हिडीओ व पबजी गेम खेळत होता. यामुळे आजी सतत काळजीपोटी त्याला मोबाईल वापरू नकोस असे सांगत होती. तसेच, मी गेल्यावर तुझे काय होणार असेही म्हणत.

गेल्या आठवड्यात आजीने मोबाईल वापरू नकोस म्हणून रागवले होते. यामुळे तो नैराश्यात होता. तो मोबाईलही कमी वापरत होता. सोमवारी सायंकाळी आजी एका खोलीत झोपली होती. त्यावेळी त्याने दुसर्‍या खोलीत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजी उठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना मोबाईल दिसून आला. त्यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. पबजी गेम व टिकटॉक व्हिडीओ पाहण्यावरूनच रागवल्याने आत्महत्या केल्याचे स्थानिकाचे म्हणणे आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

Visit : policenama.com