Coronavirus : पुण्यात 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू, 164 नवे ‘कोरोना’बधित आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून आज (मंगळवार) दिवसभरात 164 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासनामार्फत उपाय योजना केल्या जात आहे. मात्र, त्याच दरम्यान आज दिवसभरात पुणे शहरात सर्वाधिक 164 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज अखेरीस 2 हजार 737 एवढी रुग्णांची संख्या झाली आहे. तर आज एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 156 मृतांची संख्या झाली आहे. आज दिवसभरात 120 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 107 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 25 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुणे शहारात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 737 एवढी झाली आहे. यामध्ये डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 2430 आणि ससूनमध्ये 307 रुग्ण आहेत. पुण्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 1372 असून आजपर्यंत 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 989 रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.