Pune : 17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात युवकाविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमीष दाखवुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ती मुलगी गर्भवती राहिल्यानंतर रुग्णालयात गेली. त्यानंतर डॉक्टरांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अजय जाधव (वय 22) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते. यादरम्यान आरोपीने ती कॉलेजात जात असताना तिचा पाठलाग केला. तिला बोलून प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर लग्नाचे आमिष दाखविले. लग्न करणार असल्याचे सांगत या तरुणीला खोलीवर नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यात तरुणी 22 आठवड्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.