Pune : 19 वर्षीय तरूणीचे आई-वडिल मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरात घुसून बलात्कार; तरूणाने व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेल, Video चे स्क्रीन शॉट Instagram वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिला बावधन टेकडीवर नेल्यानंतर तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. तर मुलीचे आईवडील मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून सतत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे.

या प्रकरणी अण्णा उर्फ सुहास शिंदे याच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. 2017 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 17 वर्षांची अल्पवयीन असताना तिला रस्त्यात अडवून आरोपी शिंदेने तिला बावधन टेकडीवर नेले. त्याठिकाणी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. त्यानंतर 2019 मध्ये तरुणीचे आई व वडील मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर आरोपी हा तिच्या घरात घुसला.

त्याने जबरदस्तीने बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो व्हिडीओ आईवडिलांना दाखविण्याची भिती दाखवून तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तरुणीच्या मित्राला फोनकरून तू आमच्यात पडू नको अशी धमकी दिली. त्यानंतर त्रास देत भेटण्यासाठी ये म्हणून या व्हिडीओचे स्क्रीन शॉट इन्स्ट्राग्रामवर टाकून व्हिडीओची धमकी देऊन त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. गुन्हयाचा अधिक तपास चतुःश्रृृंगी पोलिस करीत आहेत.