पुण्यात 10 आणि 12 वर्षाच्या पोरांनी PM नरेंद्र मोदींच्या फ्लेक्सवर लावलं ‘शेण’ !

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अलिकडील काळात विडंबनाच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील देहूरोड येथील भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावल्याचा धक्‍कादायक प्रकार आज (शनिवार) उघडकीस आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री हे कृत्य केलं असावं अशी चर्चा आहे.

देहूरोड येथील बाजारपेठेत भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाहेरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यास फ्लेक्सवर शेण दिसलं. त्यानंतर त्यांनी ही बाब पदाधिकार्‍यांना सांगितली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून फ्लेक्स हटविला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच परिसरातून माहिती काढली.

परिसरातील 10 आणि 12 वर्षाच्या मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे कृत्य केल्याचे कबुल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मोरे करीत आहेत. या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर अफवा व गैरसमज पसरवु नयेत म्हणून पोलिसांनी तात्काळ शांतता कमिटीची बैठक देखील घेतली.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like