Pune : चतुःश्रृंगी परिसरात सोनसाखळी चोरीच्या 2 घटना, चोरटे पुन्हा अ‍ॅक्टीव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दीड तासात सोन साखळी चोरट्यांनी चतुःश्रृंगी (Chathushringi ) परिसरात धुमाकूळ घालत वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील 2 लाख रुपयांच्या सोन साखळ्या हिसकावून नेल्या. यामुळे पुन्हा सोन साखळी चोरटे ऍक्टिव्ह झाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी (Chathushringi ) पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी म्हणून दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्ती असे वर्णन यात टाकण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 24 वर्षीय महिला भाच्यासोबत दुचाकीवरून घरी येत होत्या. यावेळी त्या सुतारवाडी येथे आल्यानंतर पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यानी फिर्यादी यांच्याजवळ येत गळ्यातील 1 लाख 10 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावली अन पळ काढला. महिला दुचाकीवरून पडतापडता वाचली. त्यांनी आरडाओरडा केला. पण, सुसाट दुचाकीवर पसार झाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच येथे धाव घेत तपास सुरू केला .

पोलीस इकड त्या चोरट्याचा शोध घेत असतानाच पाषाणला दुचाकीवर आलेल्या दोन चिरट्यानी डाव साधत आणखी एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली. याबाबत 40 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. फिर्यादी या पाषाण भागात राहतात. त्या साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोपेडवरून घरि जात असताना बालाजी चौकातील एन.आय.व्ही प्रयोग शाळेच्या समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या सोन साखळी चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली आहे. यात देखील अचानक प्रकार घडल्याने फिर्यादी या घाबरून गाडीवरून खाली पडत होत्या. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.

 

Also Read This : 

 

Lockdown in Maharashtra : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन वाढणार?, राजेश टोपेंचे संकेत

 

मशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक

 

भिंतीतून येतेय दारु, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)

 

प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या

 

SSR Death Case : सुशांतसिंह राजपूतच्या जवळच्या मित्राला हैदराबादमधून अटक, NCB ची माहिती

 

Coronavirus Prevention : कोरोना व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून कसे रोखावे, जाणून घ्या ‘हे’ 6 उपाय