पुणे शहर पोलीस दलातील आणखी दोघांना ‘कोरोना’ची लागण, बधितांची संख्या 25 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. यात दोन दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्यास लागण झाली होती. त्याच्याच वडिलांना त्याच्यापासून लागण झाली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील संख्या 25 वर पोहचली आहे.

शहरात कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पालिका प्रशासन यासाठी काम करत आहेत. पोलीस विभाग गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून 24 तास काम करत आहे. त्यामुळे पोलिसांचा आकडा देखील वाढत आहे. पुण्यात मध्यवस्ती स्थानकातून सुरू झालेली कोरोनाची लागण आता इतर पोलीस ठाण्यात होऊ लागली आहे. शहरात आज आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी मध्यवस्तीमधील एका कर्मचाऱ्यास लागण झाली होती. त्याच्याच वडिलांना देखील लागण झाल्याचे समोर आले आहे. वयस्कर असल्याने ते रजेवर होते. तर दुसरा कर्मचारी कर्तव्यावर असताना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील आतापरियंत 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.