Pune : जुन्या कात्रज घाटातून आरोपींना पलायन करण्यास मदत करणारे 2 पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  न्यायालयात हजरकरून पुन्हा कारागृहात घेऊन जात असताना त्याना परस्पर पिंपरीला नेले. परंतु, तेथून त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे आदेश काढले आहेत.
पोलिस शिपाई विजय आनंदराव मांढरे आणि पोलिस हवालदार सूर्यनारायण थंबराज नायडू अशी या बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे दोघे मुख्यालयात नेमणूकीला असताना संतोष चिंतामणी चांदीलकर, राजू महादेव पात्रे व संतोष मच्छिंद्र जगताप या तिघांनी १० एप्रिल २०१७ रोजी मोरवाडी पिंपरी येथून पलायन केले होते. मात्र, या दोघांनी हवालदार संजय काशिनाथ चंदनशिव यांच्यामार्फत संगनमत करून जुना कात्रज घाट येथे येऊन ते पळून गेल्याची खोटी तक्रार दिली होती. पोलिस पार्टी म्हणून तिघा आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर करुन पुन्हा कारागृहाच्या स्वाधीन करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्यांनी भोर येथे बिर्याणी हाऊसमध्ये गाडी थांबविली. आरोपींना जेवणाबरोबरच मद्यपान करण्यास मदत केली. जुना कात्रज घाट येथून त्यांना खासगी वाहनाने मोरवाडी पिंपरी येथे जाऊ दिले. तसेच साप्रस पोलिस चौकीजवळ त्यांची वाट पहात थांबले. त्यानंतर ते पळून गेलेले असल्याचे माहिती असताना ते जुना कात्रज घाट येऊन पळून गेल्याची खोटी तक्रार दिली. हे सर्व कृत्य विभागीय चौकशीत निष्पन्न झाले. त्याना माढंरे व नायडु यांना पोलिस सेवेतून बडतर्फ केले आहे.