Pune : बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात फोटो काढण्यासाठी उतरलेले 2 तरूण गेले वाहून, शोधकार्य सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात फोटो काढण्यास उतरलेले दोन तरुण वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल व डेक्कन पोलीस दाखल झाले आहेत.

वय 21 व 17 वर्षे असणारी दोन तरुण वाहून गेले आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान सौरभ आणि त्याचे दोन मित्र बाबा भिडे पुला खाली फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र आत गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. यावेळी तिसऱ्या मित्राने व नागरिकांनी याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे. पण त्यांचा शोध घेतला जात आहे, असे अग्निशमन दलाचे अधिकारी नाईकनवरे यांनी दिली आहे.