Pune : शहरातील आरोग्य सेना व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्तविद्यमाने Lockdown काळात 102 रिक्षा रुग्णवाहिकांची 24 तास मोफत सेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील आरोग्य सेना व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्तविद्यमाने लॉकडाऊन काळात (दि. 1 ते 15 मे) या 15 दिवस 102 रिक्षा रुग्णवाहिकांची २४ तास मोफत सेवा दिली जात आहे. पूर्ण शहरात ही सुविधा असणार आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी अडचणी येतात. वेळेत रुग्ण पोहचत नाहीत. त्यामुळे अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. यापार्श्वभूमीवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त साधत आता शहरात आरोग्य सेना व महाराष्ट्र रिक्षा पंचायत (१५ मे) शहरातील कोरोनाग्रस्त जनतेसाठी रिक्षा रुग्णवाहिकांची २४ तास मोफत सेवा सुरु केली आहे. शहरातील 102 रिक्षा चालक यात सहभागी झाले आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना काही वेळात रिक्षा रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

आरोग्य सेनेचे संस्थापक प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, सल्लागार कुमार शेटे, मुराद काझी हे उपस्थित होते. ही सेवा देणाऱ्या रिक्षा रुग्णवाहिकेत आणखी 100 रिक्षांची भर घालण्याचा दोनही संघटनांचा मानस आहे.

येथे साधा संपर्क…

सहरतील गरजवंत रुग्णांनी या सेवेसाठी 9850494189 आणि 7841000598 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.