Pune : वेल्हे तालुक्यातील 24 वर्षीय तरूणावर दुचाकीवरून आलेल्यांकडून भरदिवसा गोळीबार, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात एका चहा विक्रेत्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात चहा विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विलास नथु बोरगे (वय 24, रा. वाजली गाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आली.  मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप याची तालुक्यातील वांजळी गावात चहाची टपरी आहे. दीड वाजण्याच्या सुमारास दोघेजण दुचाकीवर चहा पाण्यासाठी आले. त्यांनी दिलीप यांच्याकडून सिगारेट घेतली आणि सिगारेट घेऊन दोघे निघून गेले. मात्र काही वेळातच दोघे दुचाकीवरुन परत आले. त्यांनी थेट विलास यांच्यावर गोळी झाडली. गोळी विलास यांच्या छातीत लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस व एलसीबीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेऊन हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. नेमका गोळीबार का झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.