Pune : भाजपच्या महाअभियानात 25 हजार मतदारांची नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी महाअभियनात रविवारी २५ हजार पदवीधर मतदार नोंदणी करण्यात आली, असे भारतीय जनता पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार नोंदणीसाठी पुण्यात रविवारी नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. शहरात ५५०हून अधिक ठिकाणी बूथ उभारण्यात आले आहे. अभियानात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, महापौर मुरली मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र नोंदणी प्रमुख राजेश पांडे सहभागी झाले होते.

निवडणूक आयोगाची पुढील सूचना येईपर्यंत मतदार नोंदणी प्रक्रिया चालू राहील, असे पक्षाच्या पत्रकात म्हटले आहे.