Pune : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीला 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं संपवलं ! दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर गळा दाबून खून; लोणीकाळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहाच महिन्यापूर्वी विवाह झालेला असताना नवविवाहित तरुणीने इंजिनीअर पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करत पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक म्हणजे, त्या दोघांचं प्लॅनिंग पाहून पोलीस आवक झाले आहेत. त्यांनी कोरोनाच कारण देत पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् बेशुद्ध होताच त्याचा गळा आवळून strangulation खून केला. तर झोपेतून उठत नाही म्हणून ससून रुग्णालयात नेले होते. पण, पोलिसांना याची कुणकुण लागली अन् या खुनाचं गुढ उकललं.

मनोहर हांडे (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय 19, रा. उरुळी कांचन) व प्रियकर गौरव मंगेश सुतार (वय 19, फुरसुंगी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (strangulation)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी व गौरव यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. पण, दोघांच्या कुटुंबाचा या विवाहाला विरोध होता. दरम्यान, जानेवारी 2021 महिन्यातच अश्विनीच्या कुटुंबाने तिचा मनोहर याच्याशी विवाह जमवला आणि त्यांचे लग्न लावले. पण, लग्नापूर्वीच प्रेम अश्विनी व गौरव यांना गप्प बसू देत नव्हते.

त्यांनी मनोहरचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार प्लॅनिंग केलं. नेमका कोरोनाचा काळाचा त्यांनी फायदा उठवायचा ठरवला. त्याच काळात मनोहर याला कोरोना झाला होता. त्यांनी हीच संधी साधली. तिनं एकेदिवशी प्रियकर गौरव याच्याकडून झोपेच्या गोळ्या आणून घेतल्या. त्यानंतर त्याला झोपताना दुधातून या झोपेच्या गोळ्या दिल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा गळा आवळून strangulation खून केला. यानंतर हे झोपेच्या गोळ्याचे पॉकेट टाकून देत सकाळी मनोहर उठत नाही उठत नाही असा कांगावा केला. त्याला घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोरोनाचा कांगावा होताच; त्यामुळे या दोघांना आता पोस्ट मार्टम होणार नाही असे वाटले. मात्र कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि पोस्ट मार्टम झालं. पण, त्यातही काही निश्चित असे काही समोर आले नाही. मात्र ससून रुग्णालयाने याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ईडी दाखल केली होती.

लोणी काळभोर पोलिसांनी ईडी दाखल केली. पण, त्याचा तपास सुरू केला. पोलिसांना संशय येत होता तर काही दिवसांनीच कुणकुण लागली. त्यानंतर तपासला सुरुवात झाली आणि गौरव याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेत माहिती विचारली. त्यानंतर त्याने खून केला असल्याची कबुली देत सगळं प्रकरण उघडकीस सांगितले. त्यानुसार या दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, कर्मचारी नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, प्रमोद गायकवाड, रोहिदास पारखे, दिगंबर साळुंके, निखील पवार, राजेश दराडे, बाजीराव वीर आणि शैलेश कुदळे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष काळे करीत आहेत.

Pune Crime News : लग्नापुर्वीच्या संबंधास ‘अडसर’ ! 27 वर्षीय पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन गळा दाबून संपवलं, 19 वर्षीय पत्नी अन् तिच्या प्रियकराच कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना