पुण्यातील IT कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणीचा बसमध्ये ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यामध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पुण्यातील एका आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरूणीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी गेली होती. गावाहून परत पुण्यात येत असताना स्लिपर कोच ट्रॅव्हल बसमध्ये बस चालकानाने तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील तरूणी आणि पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणी कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी गेली होती. गावावरून परत येत असताना ट्रव्हल्स बसमध्ये ती बसली. ही तरुणी एका आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. या तरुणीचा प्रवासादरम्यान बस चालक राजेंद्र शर्मा याने विनयभंग केला. हा प्रकार 7 फेब्रुवारी रोजी घडला असून तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चालक राजेंद्र शर्मा याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी हा गुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.