बायकोला बोलत असल्यावरून युवकावर कोयत्यानं वार करणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून एकावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तिघांना पकडले असून, एक जन पसार झाला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी विजय रणसुरे (वय 32, रा. येरवडा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन उर्फ बापु कान्हु खरात (वय 43), राकेश शामराव चौरे (वय 39) आणि गणेश दगडू मोरे (वय 39, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीतील आहेत. दरम्यान, यातील राकेश चौरे याच्या पत्नीशी आरोपी फोनवर बोलत असल्याचा संशय होता. यावरून गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्याला शास्त्रीनगर परिसरात बोलावले. त्यामुळे फिर्यादी हे त्याठिकाणी गेले. यावेळी राकेश याच्यासोबत नितीन खरात तसेच गणेश मोरे व आणखी एकजन होता. यावेळी राकेश व त्याच्यात वााद झाला असता राकेश याने फिर्यादीच्या कानशीलात लगावली.

त्यानंतर कोयत्याने डोक्यात वार केले. त्यानंतर नितीन उर्फ बापु खरात याने याच कोयत्याने पुन्हा डोक्यात व खांद्यावर वार केले. तर, इतर दोघांना त्यांना खाली पाडून बेदम मारहाणकरत कोयत्याने सपासप वारकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी येथून पसार झाले. या घटनेत विजय रणसुरे हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखलकरून तिघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे हे करत आहेत.

You might also like