Pune News : कोरेगाव पार्क परिसरातील ‘स्पा’च्या मॅनेजरकडून 15 हजार रुपयांची खंडणी घेणारे 3 तोतया पत्रकार ‘गोत्यात’, पोलिसांकडून मोठी कारवाई

पुणे (Pune) : पोलिसनामा ऑनलाइन – स्पाच्या मॅनेजरकडून 15 हजार रुपयांची खंडणी घेताना तोतया पत्रकारांना पोलिसांनी आज पकडले. कोरेगाव पार्क पोलिसांच्या हद्दीत आज हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी एका स्पा मॅनेजरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विशाल पायाळ, सन्नी टाकपेरे व पंकज जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे स्पा सेंटर आहे. ते स्पा सुरू ठेवण्यासाठी तसेच त्याबाबत बातमी न लावण्यासाठी तिघांनी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. महिन्याला ते 15 हजार रुपये मागत होते. याबाबत त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज पोलिसांनी या तिघांना खंडणी प्रकरणात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने केली आहे.