Coronavirus : पुण्यात आणखी तिघांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 236 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगभरात थैमान घातलं आहे. अमेरिका, स्पेन, इटलीसह इतर विकसीत देशात सध्या कोरोनामुळं मृत्यूचं तांडव चालू आहे. भारतात देखील परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 26 बळी गेले आहेत. आज (शनिवार) आणखी तिघांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं पुण्यातील मृतांचा आकडा आता 29 वर जाऊन पोहचला असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 236 वर जाऊन पोहचली आहे.

9 मार्च रोजी कोरोनाचे पहिले दोन रूग्ण पुण्यात आढळले होते. तेव्हापासून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 30 मार्च रोजी एका 52 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळं मृत्यू झला. तो पुण्यातील कोरोनाचा पहिला बळी होता. मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. आज कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 236 वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील लॉकडाऊन देखील 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही वेळापुर्वीच जाहीर केले आहे. नागरिकांची घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळावेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.