Pune : धक्कादायक ! आयुक्तालयातील 3 अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (NP News Network) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अलीकडील काळात कमी होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे पण पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 3 अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि तिन्ही आधिकारी सध्या घरी आयसोलेट झाले आहेत.

मंगळवारी TRM मीटिंग संपल्यानंतर एका अति वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर दुपारी अति वरिष्ठ अधिकाऱ्यास ताप आला. त्यांनी कोरोनाची टेस्ट केली त्यावेळी ते पॉझिटिव्ह आले. बैठकी दरम्यान त्यांच्या जवळ बसलेल्या (समोर) इतर 2 अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज (शुक्रवार) त्रास जाणवला. त्या दोघांनी टेस्ट केली असता त्यांच्या टेस्ट देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकाच वेळी पुणे शहर पोलीस दलातील 3 अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या तिन्ही आधिकारी घरीच उपचार घेत आहेत.

You might also like