Pune : कात्रज-वंडरसिटी-भारती विद्यापीठ परिसरात गेल्या 24 तासात वेगवेगळ्या ठिकाणी 3 आत्महत्या; रिक्षाचालकाचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील कात्रज परिसरात एका दिवसात तीन जणांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय 35), पोपट पांडुरंग सलगर (वय 40) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. तर एकाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात या आत्महत्या झाल्या आहेत. तिन्ही आत्महत्या नेमका का झाल्या या समजू शकलेले नाहीत. त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याच्या नोंदी करण्यात आल्या असून, तपास सुरू आहे.

दरम्यान निरंजन साळुंखे यांनी वंडर सिटीजवळ आत्महत्या केली आहे. ते रिक्षा चालक आहेत. तर पोपट हे बिगारी कामे करत होते. त्यांनी सुखसागर नगर येथे आत्महत्या केली आहे.

तसेच एका अंदाजे 30 वर्ष असलेल्या व्यक्तीने कात्रज डेरीजवळील मोरेबाग बस स्टॉपजवळ असणाऱ्या टॉयलेट येथे आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, एकाच दिवशी तीन आत्महत्या घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.