पुण्यातील लॉकडाऊनमध्ये वास्तुविशारद पत्नीचं इंजिनियअर पतीसोबत झालं भांडण, ‘भाग्यश्री’नं केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले. त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात बसून आहेत. त्यातच कौटुंबिक वाद वाढले आहेत. पुण्यात अशाच एका कौटुंबिक वादातून पत्नीने टोकाचे पाऊल उचल आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊमुळे पती घरीच असायचा. याच दरम्यान दोघांमध्ये शुल्क कारणावरून वाद होत होते. सतत होणाऱ्या वादाला कंटाळून भाग्यश्री अमेय पाटील (वय-30) या महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना कोथरुड परिसरात घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही तिसरी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री या वास्तुविशारद असून लॉकडाऊनमुळे त्या घरूनच काम कर होत्या. तर त्यांचे पती अमेय पाटील हे इंजिनिअर असून ते देखील घरी बसूनच काम करत होते. या दोघांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. यानंतर भाग्यश्री खोलीत निघून गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी भाग्यश्रीने खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने अमेय घाबरला. त्याने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दार उघडल्यानंतर भाग्यश्रीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अमेय आणि शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून त्यांना खोलीमध्ये कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. अलंकार पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.