पोलिसांचे पास मिळविण्यासाठी 33 हजार नागरिकांनी केली नोंदणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जमावबंदी व वाहनबंदी केली असून या काळात अत्यावश्यक कामांसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या पास योजनेला 33 हजार नागरीकांनी अर्ज केले आहेत. त्यातील 2440 नागरिकांना पास दिले आहेत. मोबाईलवर एसएमएसच्या हे डिजिटल पास दिले जात आहे.

जगात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यासह पुण्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे पोलिसांनी शहरात जमावबंदी, वाहनबंदी लागू केली आहे. जीवनाश्यवक सेवांना यामधून वगळण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना तातडीची आवश्यकता असल्यास बाहेर पडण्याची परवागी दिली जात आहे.

पोलिसांनी अडचणी शंका विचारण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक व इमेल आयडी दिले आहेत. त्यावर देखील नागरिकानी मोठ्या प्रमाणात अडचणी मांडल्या आहेत.

यानंतर पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक काळात बाहेर पडण्यासाठी पुणे पोलिसांच्या www.punepolice.in या वेबसाईटवर सर्व तपशील भरून परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन केले होते.

त्याअर्जातील सर्व माहिती पडताडून अर्ज मंजूर झाल्यास नागरिकांना क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठविला जाईल. पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस नागरिकांनी पोलिसांना दाखविल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल असे सांगितले होते.

योजनेनंतर पुण्यातील ३३ हजार २३४ नागरिकांनी डिजीटल पाससाठी अर्ज केले आहेत. पण, अनावश्यक कामासाठीच जास्त अर्ज आले आहेत.

आत्यावश्यक सेवेसाठी आलेले २४०३ अर्ज मंजूर करून त्यांना डिजीटल पास देण्यात आले आहेत. तसेच, १०९७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. भाजीपाला, किरणा, दूध, ग्लोसरी अशा गरजेच्या वस्तू पायी आणाव्यात. त्यासाठी पासची आवश्यकता नाही. नागरिकांनी अत्यावश्यक सुविधेसाठीच डिजीटल पास द्यावा, म्हणून अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.