केटरिंग व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी चारजण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा भागात किरकोळ कारणावरुन केटरिंग व्यवसायिकाच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता.

बच्चू उर्फ नवीन मनोज वडावराव (वय १८, रा. विश्रांतवाडी), आमीन जावेद शेख (वय १८, रा. धानोरी), राहूल तान्हाजी भोसले (वय १९, रा. धानोरी), तैय्यब इस्त्राइल शेख (वय १८, रा. चऱ्होली बुद्रूक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रतीक हनुमंत वन्नाळे (वय २७, रा. पंचशीलनगर, येरवडा ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक केटरिंग व्यवसायिक होता. २५ मे ला दुपारी दुचाकीवरुन जाताना त्याची बच्चू उर्फ नवीनशी किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे त्याच रात्री बच्चूसह इतर आठजणांनी प्रतीकच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करुन खून केला होता. या घटनेमुळे येरवडा भागात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तर आरोपीच्या घरावर गडगफेक देखील करण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यानंतर चौघांना अटक केली. तर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व पथकातील रामदास घावटे, अमजद शेख, सचिन रणदिवे, भरदुडे, शरद दौंड, राहूल परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like