Coronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज ‘पठण’ ! पिंपरी पोलिसांकडून 13 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 144 कलमानुसार बंदचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व धर्मांच्या सार्वजनिक प्रार्थना स्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या आदेशाला पिंपरी चिंचवड शहरात बगल दिली जात आहे. शहरात एका इमारतीच्या छतावर 40 ते 50 जणांनी नमाज पठण केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, असे जरी असले तरी दुसरीकडे नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. एकीकडे देशभरासह महाराष्ट्रात मंदिरे, प्रार्थनास्थळ नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात काही जणांनी एकत्र येत एका इमारतीच्या छतावर सामूहीक नमाज पठण केले. यावेळी 40 ते 50 जणांची उपस्थिती असल्याचे एका फोटोद्वारे समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी 13 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींवर कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदासह इतर कलम लावण्यात आले आहेत. तपास पोलीस करत आहेत.