Pune : रेड लाईटमधील ‘त्या’ महिलांचे अनुदान लाटून घोटाळा केल्याप्रकरणी 5 जणांना अटक; ‘कायाकल्प’ संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पैसे लाटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देहविक्री करणाऱ्या महिलांच्या खात्यावर 15 हजार रुपये टाकण्याचे आदेश दिल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, 3 महिला व त्यांच्या दोन साथीदारांनी 200 हुन अधिक महिलांच्या खात्यावर आलेले 15 हजाराच्या अनुदानापैकी 10 हजार रुपये त्यांच्याकडून काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच जणांना अटक केली आहे.

अमोल दत्तात्रय माळी (वय 25, रा. धनकवडी) व महेश राजू घडसिंग (वय 26, रा. गणेशखिंड रोड) यांच्यासह 3 महिलांना अटक केली आहे. याबाबत नायब तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आहेत. दरम्यान शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन केल्यानंतर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या खात्यावर 15 हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या महिलांचे ओळखपत्र न घेता त्यांना पैसे देण्याचे आदेश दिले होते. त्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती.

दरम्यान, या महिलांची यादी बनविण्याचे काम ‘कायाकल्प’ या संस्थेला काम दिले होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी धुणीभांडी करणाऱ्या व गोरगरीब महिलांना एक संस्था महिना प्रत्येकी 5 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांची जावे यादीत टाकली. या महिलांचे खात्यावर काही दिवसांपूर्वी शासनाचे 15 हजार रुपये अनुदान आले. त्यावेळी या आरोपींनी या महिलांकडून यातील 10 हजार रुपये हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना व इतरांना काही पैसे द्यायचे आहेत, असे सांगत त्यांचे खात्यातून पैसे काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे.

त्यांनी अनेक महिची फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.