पुणे : खडकवासला धरणातून ५१३६  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे तुडुंब भरलेल्या पुण्यातील खडकवासला धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले  आहेत. त्यामुळे पुणे मेट्रोचे काम देखील थांबवण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3800901e-88e1-11e8-a2a9-1bac0c7f43e3′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खडकवासला धरणातून ५१३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  हे पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे त्यामुळे जिमखाना आणि संभाजी उद्यानाच्या मागील बाजूस सुरु असलेले मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे. पण पाण्याचा विसर्ग थांबल्यानंतरच काम पुम्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणारआहे. जर पावसाचा जोर वाढला तर ९४१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. जर पावसाचा जोर कमी झाला तर कमी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील सिंचनासाठी बांधलेल्या सूर्या प्रकल्पातील कवडास व धामणी धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने  या धरणाचे दरवाजे सकाळी साडे अकरा वाजता उघडण्यात आले. धामणीचे ५ दरवाजे ३ फुटांपर्यंत उघडण्यात आले अाहेत. त्यातून प्रति सेकंद ९९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कवडास धरणातून सेकंदाला तीस हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग होत आहे. मात्र, येथील परिस्थिति नियंत्रणात असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.