Pune : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 549 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, साताराची जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 4 लाख 41 हजार 652 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 87 हजार 476 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 32 हजार 479 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 15 हजार 11 रुग्णांपैकी 2 लाख 88 हजार 928 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 18 हजार 703 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.72 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 656 रुग्णांपैकी 37 हजार 308 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 910 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 309 रुग्णांपैकी 32 हजार 755 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 207 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 73 रुग्णांपैकी 38 हजार 902 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 591 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 427 रुग्णांपैकी 43 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 68 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 88 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 549, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 128, सांगली जिल्ह्यात 215 तर कोल्हापूर जिल्ह्यात 51 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 668 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 191, सातारा जिल्हयामध्ये 726, सोलापूर जिल्हयामध्ये 263, सांगली जिल्हयामध्ये 357 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 131 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 29 हजार 196 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 87 हजार 476 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 19 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )