Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 6 जणांचा मृत्यू तर 57 पॉझिटिव्ह, 168 बाधितांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 57 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात तब्बल 168 बाधित उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनमुळं 320 जणांचा बळी गेला आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या 6529 एवढी आहे. त्यापैकी तब्बल 3950 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 2259 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 174 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 46 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या दोन आठवडयामध्ये पहिल्यांच थोडाफार दिलासा देणाारी आकडेवारी समोर आली आहे. सध्या लॉकडाऊन 5.0 सुरू असून तो 30 जून पर्यंत लागू असणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like