पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश ! खोली भरून देशी अन् विदेशी चलनातील बनावट नोटा जप्त, लष्करी जवानासह 6 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात काय होईल याच नेमच राहिला नसून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि लष्करी सैन्याने विमानतळ भागात एक खोलीभर देशी अन् विदेशी चलनातील बनावट नोटा पकडल्या आहेत. पोलीस चक्रावून गेले आहेतच पण नोटा मोजायला मशीन आण्यात आल्या आहेत. जवळपास 90 कोटींहून अधिक रक्कम आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार सध्या याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांनी विमानतळ भागात एक रूम भाडयाने घेतली होती. त्यानुसार ते याठिकाणी भारतीय चलनातील बनावट नोटाची साठवणूक करत होते.

दरम्यान हे 6 ही जण देशात फसवणूक करणारे नॅशनल गुन्हेगार आहेत. ते नागरिकांना भारतीय चलनाच्या नोटा देतो, असे सांगून त्यांच्याकडून परदेशी चलन घेत असत. त्यानुसार ते फसवणूक करत होते.
शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. तर लष्करी इंटिलीजन्सला देखील समजले होते. त्यानुसार गुन्हे शाखा चार आणि लष्कराच्या सैन्याने ट्रॅप लावला. 25 लाखांची बोलणी झाली. त्यानुसार त्यांना जाळ्यात पकडले आणि चौकशी सुरू केली. ऑन त्यावेळी त्यांच्याकडे 2 लाख ओरिजनल नोटा मिळाल्या आणि त्याखाली बनावट भारतीय चलनाच्या नोटा. त्यानंतर तपास केला असता पोलिसांना एक रूमभरून नोटा आढळून आल्या. त्या जवळपास 90 कोटींहून अधिक असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आता या नोटा मोजण्यास मशीन घेऊन मानस बोलविण्यात आल्या आहेत. मशीनन देखील नोटा मोजायला काही तास लागतील असे सांगण्यात आले आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, सह आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.