Coaonavirus : पुणे विभागात ‘कोरोना’चे 6487 रूग्ण तर आतापर्यंत 312 जणांचा मृत्यू, उपचारानंतर 3159 बाधित झाले बरे

पुणे : पुणे विभागातील 3 हजार 159 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 487 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 15 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 367 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 353, सातारा जिल्ह्यात 40, सोलापूर जिल्ह्यात 24, सांगली जिल्ह्यात 8, कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 241 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सोलापूर जिल्हयातील 548 कोरोना बाधीत रुग्ण असून 224 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 284 आहे. कोरोना बाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सांगली जिल्हयातील 70 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 228 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यत विभागामध्ये एकुण 68 हजार 668 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 58 हजार 801 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 779 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 52 हजार 403 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 487 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 27 लाख 40 हजार 696 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 68 लाख 40 हजार 875 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 636 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
(टिप : – दि.23 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)