पुण्यातील 7 सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्‍त पदी बढती दिल्यानंतर आज पुणे पोलिस आयुक्‍तालयात हजर झालेल्या नवीन सहाय्यक पोलिस आयुक्‍तांना आणि पुर्वीपासुन आयुक्‍तालयात असलेल्या एसीपींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांबाबतचे आदेश सह पोलिस आयुक्‍त डॉ. रविंद्र शिसवे यांनी काढले आहेत.

सहाय्यक पोलिस आयुक्‍तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे अंतर्गत बदली झाली हे पुढील प्रमाणे.

सर्जेराव महादेव बाबर (पदोन्‍नतीने हजर ते एसीपी, प्रशासन), रामचंद्र जानबा देसाई (पदोन्‍नतीने हजर ते एसीपी, येरवडा विभाग), पोमाजी धारू राठोड (पदोन्‍नतीने हजर ते एसीपी, सिंहगड रोड विभाग), सुनिल पुंडलिकराव कलगुटकर (पदोन्‍नतीने हजर ते एसीपी, वानवडी विभाग), रामचंद्र महादेव गायकवाड (पदोन्‍नतीने हजर ते एसीपी, वाहतूक शाखा), डॉ. शिवाजी पंडितराव पवार (एसीपी, येरवडा विभाग ते एसीपी, अभियोग) आणि मिलिंद कालिदासराव पाटील (एसीपी, वानवडी विभाग ते एसीपी, आस्थापना)

आरोग्यविषयक वृत्त