वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली परिसरामध्ये दिवसामध्ये सात विषारी सापडले असून यामध्ये चार नाग,तीन घोणस,एक मणियार ,एक धामण असे एकूण नऊ साप सापडले असून वाघोलीतील अमोल डाडर व रोहन कद्रे,या सर्पमित्रांनी त्यांना निरार्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे. सापांच्या मिलनाचा कालावधी असल्याने जोडीने साप दिसत असून नागरिकांनी सावधानता बाळगून साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवावे असे आवाहन सर्पमित्र अमोल डाडर यांनी केले आहे.
वाघोली येथील दुबे नगर,भाडळे वस्ती येथे साप असल्याची माहिती सर्पमित्र अमोल डाडर यांना समजली. त्यांनी त्या परिसरात जावून पाहिले असता अजगर साप नसून विषारी घोणस साप,नाग मण्यार असल्याचे दिसले. वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांनी सर्व सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. बुधवारी एकाच दिवसामध्ये दोन जोडीने असे चार फिरणाऱ्या चार सापांना पकडले असून.
याबाबत माहिती देताना सर्पमित अमोल डाडर यांनी सांगितले कि, पुढील दोन महिने हा सापांचा मिलनाचा कालावधी असतो, अशावेळी दोन पेक्षा जास्त दिशू शकतात. तेव्हा नागरिकांनी अंधश्रद्धेच्या बळी पडून कापड किंव्हा हळदीकुंकू, नारळ, झाकण्याचे तसेच पुजेचे प्रकार करू नयेत. काही उत्साही तरूण मंडळी त्यास अजगर समजून पकडतात पर्यंत करतात त्या दरम्यान वेळा साप चावतात व मृत्यु होतात. तेव्हा अशा वेळेस नागरिकांनी असा कुठलाही प्रकार न करता घाबरून न जाता त्वरीत अमोल डाडर मो.9860126551, रोहन कद्रे मो. 9766821049 वरील मोबाईल नंबर वर सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
Visit : Policenama.com
- नक्की किती तास झोप घ्यावी ? कमी आणि जास्त झोपेचे ‘हे’ आहेत ५ परिणाम
- शरीराच्या सर्व अवयवांचा होतो व्यायाम, द्रोणासनाचे ‘हे’ ३ फायदे
- लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- त्वचा सुंदर बनविण्यासाठी ‘या’ ८ टिप्स तुम्हाला पडतील उपयोगी, जाणून घ्या
- कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे
- मज्जातंतू कार्यक्षम होण्यासाठी करा ‘परिवर्तित चक्रासन’, हे आहेत ५ फायदे