Pune : पुण्यात पाळणा घर चालविणार्‍या महिलेच्या 18 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, वानवडीत FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पाळणा घर चालवणाऱ्या महिलेच्या मुलानेच एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीची आई जॉबला जात असताना आपल्या दोन मुलींना या पाळणा घरात ठेवून जात असत. वानवडी परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 18 वर्षीय मुलाला पकडले आहे. हा प्रकार 2017 ते एप्रिल 2021 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वानवडी परिसरात राहतात. त्यांना दोन मुली आहेत. त्या नोकरी करतात. नोकरीला जाताना घरी कोणी नसल्याने त्या दोन्ही मुलींना पाळणा घरात ठेवत असत. शेजारीच राहत असलेल्या एका महिलेच्या घरी हे पाळणा घर होते. त्या दोन्ही मुलींना त्यांच्याकडे पाळणा घरात ठेवत. पाळणा घराचे महिन्याला 3 हजार रुपये फिर्यादी या देत होत्या. परंतु, पाळणा घर चालवणाऱ्या महिलेच्या 18 वर्षीय आरोपी मुलाने फिर्यादी महिलेच्या 7 वर्षे वयाच्या मोठ्या मुलीसोबत वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.