Pune : चंदननगरमध्ये 75 जणांनी केले रक्तदान : अमृत पठारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. मात्र, कोणाही रुग्णावर उपचार करताना अडचण येऊ नये, यासाठी रक्तदान गरज आहे. स्थानिक पातळीवरील नागरिकांनी नैतिक जबाबदारीतून रक्तदान शिबिरात 75 जणांनी रक्तदान केले, असे वडगावशेरी मतदारसंघाच्या समन्वयक, शिवअंगणवाडीच्या जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी सांगितले.

चंदननगर (खराडी-थिटे वस्ती) शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिन भगत, विभागप्रमुख विनोद प्रहाड, शिवाजी वडगुले, बालाजी शिंदे, हर्षल पैलवान, विभाग संघटिका अनिता परदेशी, अंबिका ताटीकोंडा, शारदा मठपती, पूजा धुमाळ, पीएमसी ब्लड बँकेचे भरत चौधरी, डॉ. स्वप्नील मुंगसे, ज्योती सोनटक्के, कोमल वाघमारे, रुपाली गायकवाड, रेवनसिद्ध जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भाजीपाला आणण्यासाठी कापडी पिशव्या देण्यात आल्या.

अमृत पठारे म्हणाल्या की, कोरोना विषाणूमुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून गरजूंना मदत कार्य सुरू आहे. आता रक्तदान शिबिर घेतले त्यालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, असे त्यांनी सांगितले.