पुणे : मोलकरणीने पळवले ८ लाखांचे हिऱ्याचे दागिने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

घरकाम करणाऱ्या मोलकरणीने बनावट चावीचा वापर करुन घरातील ७ लाख ७५ हजार रुपयांचे हिऱ्याचे, सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार शंकरशेठ रोडवरिल मिरा सोसायटीत मंगळवारी (दि.२१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d684948-a789-11e8-9caa-ffce35730ab2′]

याप्रकरणी संजय दोडेजा (वय-५५ रा. शंकरशेठ रोड, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दोडेजा यांनी एक महिला जुन २०१८ पासून घरकाम करण्यासाठी नेमली होती. मंगळवारी घरकाम करणाऱ्या मोलकरणीने काम सोडले. काम सोडण्यापूर्वी मोलकरणीने बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला. घरात असलेल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतमध्ये असलेले ७ लाख ७५ हाजार रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरुन नेले. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजय दोडेजा हे घरी आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. शेख हे करीत आहेत.

You might also like