पुण्यातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस आयुक्तालयातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतचे आदेश आज (गुरूवारी) रात्री काढण्यात आले आहेत.
अंतर्गत बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे त्याबाबत पुढील प्रमाणे.

1. मुरलीधर गंगाधर करपे (वपोनि, कोंढवा ते आर्थिक गुन्हे शाखा)

2. सुनिल जयसिंग तांबे (वपोनि, बंडगार्डन ते विशेष शाखा)

3. विनायक दौलतराव गायकवाड (गुन्हे शाखा ते वपोनि, कोंढवा)

4. श्रीमंत कोंडीबा शिंदे (दंगल नियंत्रण पथक ते वपोनि, बंडगार्डन)

5. क्रांती नामदेव पवार (गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), लष्कर पो.स्टे.)

6. माया दौलत देवरे (पोनि (गुन्हे) लष्कर ते पोनि (गुन्हे) चतुःश्रृंगी)

7. विजयकुमार बाबुराव लांबतुरे (पोनि (गुन्हे) चतुःश्रृंगी – बदली आदेशाधीन ते विशेष शाखा)

8. शिवाजी शंकर शिंदे (पोनि (गुन्हे) कोथरूड पो.स्टे. ते विशेष शाखा)

9. किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखा ते पोनि (गुन्हे) कोथरूड पोलिस स्टेशन)

 

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/