Coronavirus : पुण्यात 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू, 91 नवे ‘कोरोना’बधित आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून आज (सोमवार) दिवसभरात 91 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.


पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासनामार्फत उपाय योजना केल्या जात आहे. मात्र, त्याच दरम्यान आज दिवसभरात पुणे शहरात 91 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज अखेरीस 2 हजार 573 एवढी रुग्णांची संख्या झाली आहे. तर आज एकाच दिवसात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 149 मृतांची संख्या झाली आहे. आज दिवसभरात 69 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 98 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 19 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुणे शहारात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 573 एवढी झाली आहे. यामध्ये डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 2273 आणि ससूनमध्ये 295 रुग्ण आहेत. पुण्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 1335 असून आजपर्यंत 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1008 रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.