Pune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड भागात एका बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून ९६ हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी यासाठी परराज्यातील व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम कार्डचा वापर केला आहे.

याप्रकरणी अश्रय अभय दिक्षीत (वय ३६, रा. औंधगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीपकुमार दिक्षीत (वय १९), अरविंदकुमार (वय २४), अशोक कुमार (वय २५, रा. नऱ्हे) यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय स्टेट बँक सिंहगड रोड शाखेचे मॅनेजर म्हणून आहेत. त्यांच्याकडे एटीएम केंद्रात भरलेली व काढली गेलेली रक्कम पडताळणी करण्याचे काम आहे. त्यांनी यावेळी रकमेची पडताळणी केली असता त्यात त्यांना तफावत आढळली. तर ग्राहकांच्या एटीएमने पैसे काढले गेल्याचे दिसत होते. पण, ते त्या ग्राहकांना मिळाले नसल्याचे मशीनमध्ये दिसत होत्या. त्याची माहिती घेतल्यानंतर पैसे काढल्याचे काही व्यवहार संशायस्पद दिसून आले.

त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती पैसे काढताना संशयास्पद हलचाली करत होता. तसेच, कॅश डिस्पेन्सर दाबून धरल्याचे दिसत आहे. तसेच, बाहेर आलेले पैसे जबरदस्तीने ओढत होते. त्यामुळे पैसे निघाले नसल्याची नोंद होत होती. अशा प्रकाराने आरोपींनी वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या एटीएमकार्डचा वापर करून या ठिकाणाहून ९६ हजार रुपये काढल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी आठ वेळा एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like