Pune : खळबळजनक ! हडपसर परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं मित्रांकडून अपहरण, चौघांकडून सामुहिक बलात्कार, 2 दिवसांनी ‘देवदूत’ भेटला अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्या चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सूर असल्याचे समजते. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पॉस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना लागलीच पकडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय पीडित मुलगी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी घराबाहेर पडली होती. यावेळी तिचे चौघांनी रस्त्यावरून अपहरण केले. त्यानंतर सलग दोन दिवस या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केला. सुदैवाने मुलगी मध्यरात्री या नराध्यमांच्या तावडीतून सुटली. पहाटे या मुलीने एका व्यक्तीची मदत घेतली. त्याला घडला प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने थेट मुलीला हडपसर पोलीस ठाण्यात नेले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कसून माहिती घेतल्यानंतर दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान पुण्यात सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

You might also like