Pune : बोपदेव घाटात छोटा हत्ती चालवण्याचा मोह आवरला नाही, नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू तर तिघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बोपदेव घाटात कधी नव्हे तो छोटा हत्ती चालवण्याचा मोह 16 वर्षाच्या मुलावर बेतले असून, इतर तिघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या मुलाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत.

ओंकार अशोक ओव्हाळ (वय 16) असे मृत्यू झालेल्या चालक मुलाचे नाव आहे. तर तुषार शिंदे, संतोष साठे व आणखी एकजण जखमी झाला आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र आहेत. सर्व 16 ते 17 वयाची मूल आहेत. तुषार शिंदे यांच्या घरी छोटा हत्ती टेम्पो आहे. तर ओंकार घरीच असतो. तर संतोष होमगार्ड आहे.

दरम्यान सोमवारी तिघे एकत्र भेटले. यावेळी त्यांनी कानिफनाथचे दर्शन घेण्याचा प्लॅन केला. जाण्यासाठी त्यांनी तुषारच्या घरून टेम्पो आणला. दर्शन घेऊन परत येत असताना बोपदेव घाटाजवळ आल्यानंतर ते वडापाव खाण्यासाठी म्हणून थांबले. वडापाव झाल्यानंतर परत निघाले. यावेळी एकजण त्यांना मला घाटाच्या खाली सोडा, असे म्हणाला. त्यांनी त्याला टेम्पोच्या पाठीमागे बसविले व निघाले.

यावेळी ओंकार हा टेम्पो चालवत होता. तो वाहनांना ओव्हरटेककरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. काही वाहनांना ओव्हरटेक देखील केले. पण, एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो एका समोरच्या आयशीर टेम्पोला जाऊन धडकला. त्यांचा वेग इतका होता की, छोटा टेम्पोचा चक्काचुर झाला. तर ओंकार याचा जागीच मृत्यू झाला. यात चौघेही जखमी झाले आहेत. तुषार व संतोष हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर लिफ्ट दिलेला एक अनोळखी तरुण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.