Pune : लग्नाच्या आमिषाने 17 वर्षीय तरूणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयात जात येत असताना एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या अन लग्नाच्या जाळ्यात ओढून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही लोहगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. महाविद्यालयात जात येत असताना आरोपीने तिच्या अल्पवयाचा व अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिची ओळख केली. तसेच तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर तिला घर दाखविण्याच्या बहाण्याने लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगरावर नेले. त्या ठिकाणी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे तिला त्याच ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर तिने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.