Pune : 23 वर्षीय नराधम सख्ख्या मामानं केला 13 वर्षाच्या भाच्चीवर बलात्कार, पुण्याच्या हडपसरमधील नात्याला काळीमा फासणारी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांस्कृतिक आणि सुसंकृत शहरात ‘मामा’च्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून, 23 वर्षीय नराधम मामाने 13 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 23 वर्षाच्या मामावर बलात्कार तसेच पॉस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पंधरा दिवसांपूर्वी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचा आरोपी हा सख्खा मामा आहे. दरम्यान तो पिडीत अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आला. तसेच त्याने आपल्याला आजीकडे जायचे आहे, असे सांगितले. यावेळी मुलीने त्याला मम्मीला विचारते, असे म्हणून मामाचा मोबाईल घेतला आणि आईला फोन लावला.

ती आईला फोनवर बोलत असताना मामा खोलीत गेला व त्याने घराचे पडदे लागून खिडक्या बंद केल्या. त्यानंतर त्याने मुलगी फोन देण्यास आली असता त्याने मुलीवर अत्याचार केले. आई घरी आल्यानंतर तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.