Pune : 24 वर्षीय ‘छोट्या’ लपून-छपून खिडकीतून झोपलेल्या 32 वर्षीय महिलेला पहात होता, महिलेनं ‘रेड हॅन्ड’ पकडल्यानंतर केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओळखीच्या तरुणाने खिडकीतून घरात पाहिल्यानंतर महिला त्याला जाब विचारण्यास बाहेर आल्यानंतर त्याने या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी छोट्या उर्फ आकाश अरुण कांबळे (वय 24) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांची ओळख आहे. दरम्यान रविवारी रात्री फिर्यादी या त्यांच्या कुटुंबासमवेत घरामध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी हा खिडकीतून डोकावून त्यांच्या घरात पाहत होता. हा प्रकार त्यांनी पाहिला आणि त्याला विचारणा करण्यासाठी त्या बाहेर आल्या. यावेळी आरोपी छोट्या याने त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले.

तसेच त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पण, फिर्यादी यांनी तात्काळ आरडाओरडा केला. त्यावेळी फिर्यादी यांचे पती बाहेर आले. त्यावेळी त्याने फिर्यादी व त्यांच्या पतीला शिविगाळ केली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.