Pune : फेसबुकवर बारामतीमधील 34 वर्षीय महिलेशी झाली ओळख, हडपसरमधील 37 वर्षीय युवकानं पुण्यात बोलावून केला बलात्कार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – फेसबुकवर बारामतीमधील महिलेशी अनोळखी करून पुण्यात भेटण्यास बोलवत महिलेवर बलात्कार केला. तर त्या महिलेचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज रामनाथ उदावंत (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फेसबुकवर खाते आहे. आरोपीने एप्रिल २०१८ मध्ये फेसबुकवर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ती रिक्वेस्ट फिर्यादी यांनी स्वीकारली. यावेळी दोघांमध्ये चॅटींग सुरू झाले. यामाध्यमातून दोघांची मैत्री झाली. महिलेचा आरोपीवर विश्वास बसला. आरोपीने महिलेला एके दिवशी पुण्यात भेटण्यासाठी बोलविले. तसेच त्याना एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर या पुन्हा पुण्यात गणपती पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी देखील त्याने त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे अश्लिल फोटो काढून ठेवले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने त्याला भेटण्यास नकार दिल्यानंतर ते फोटो महिलेच्या नातेवाईकाला पाठवून त्यांची बदनामी केली. त्यानंतर महिलेने बारामती पोलिस ठाण्यात धाव घेतली. बारामती पोलिसांनी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे पाठविले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.