Pune : पहिलं लग्न झालं असताना फेसबुक फ्रेन्ड बनून 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकानं केलं दुसरं, तरूणीचा छळ केल्यानंतर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   फेसबुक फ्रेन्ड असलेल्या 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिक मित्रावर 21 वर्षीय तरुणीच प्रेम… प्रेमानंतर त्यांनी आळंदीत जाऊन लग्नही केला… पण विवाह होताच तिला प्रियकराच पहिलं लग्न झाल्याचं समजलं अन् तिन जिवन संपविण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली आणि तिचा छळ सुरू झाला. पुण्यातल्या हडपसर परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अविनाश अंकुश मगर (वय 35, रा. मगरपट्टा सिटी, बंगला नंबर. 22) याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात 498 अ, 494, 323, 504 व 506/1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची आणि अविनाश मगर याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही दिवसांनी याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी गेल्याच महिन्यात आळंदीत जाऊन लग्न केले. पण लग्नानंतर या तरुणीला प्रियकर अविनाश याचे पहिले लग्न झालेले असल्याचे समजले. त्यानंतर तिने याबाबत त्याला जाब विचारला. पण त्यावेळी त्याने तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पंधरा दिवसानंतरच विषारी औषध प्रशासन केले. यातून तरुणी बचावली. पण नंतर अविनाश याने तिला नादवण्यास नकार दिला, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.