Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात आणखी दोघांचा बळी, जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 34 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं पुण्यात आणखी दोघांचा बळी गेला आहे. आता पुणे जिल्हयातील मृत्यूचा आकडा 34 वर जाऊन पोहचला आहे. पुणे शहर आणि परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील काही भाग सील करण्यात आला आहे. काल (रविवार) पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर आज पुण्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 34 वर जाऊन पोहचली आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये 40 वर्षीय पुरूषाचा आणि 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांची देखील कोरोनाची टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली होती. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच लॉकडाऊनची तारीख वाढवून ती 30 एप्रिल केली आहे. प्रशासनाकडून पुणेकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.