Pune : 40 वर्षीय नराधमाचे 7 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मध्यवस्तीत काळीमा फासणारी घटना घडली असून एका 40 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी महेश पंढरीनाथ शिंदे (रा. नवी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ७ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे खेळण्यास चालली होती. त्यावेळी नराधम महेश याने तिला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना इमारतीतील काही नागरिकांच्या निर्दशनास आली. त्यांनी महेशला चांगलाच चोप दिला. ती मैत्रिणीकडे खेळण्यास जात असताना आरोपीने तिला बोलावून विनयभंग केला असून, या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचे महिला उपनिरीक्षक गीता पाटील यांनी सांगितले.