Pune : मालमत्ता नावावर करण्याची 45 वर्षीय महिलेला धमकी, बिल्डरकडे जाण्याच्या बहाण्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून बलात्कार, व्हिडीओ अन् फोटो सोशल मिडीयावर टाकण्याचा दिला ‘दम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मालमत्ता नावावर करण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 2016 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला असून, यातील बलात्कार करणारा हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो.

याप्रकरणी सुनील मधुकर जगताप (वय 52), कोंलसिंगडोंगर सिंग वाणी (वय 45) व राजेश काळूराम गायकवाड (वय 43) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 45 वर्षीय पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जगताप हा एका राजकिय पक्षाचा ‘सक्रिय’ कार्यकर्ता आहे. पण तो कुठल्याही पदावर नाही. दरम्यान, आरोपी व फिर्यादी यांची जागेच्या संबंधातून ओळख झाली होती. आरोपी राजेश गायकवाड हा आरोपी सुनील जगताप याला घरी घेऊन आला. त्यांना जागेचा मॅटर सोडवून देऊ असे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी त्यांना एका बिल्डरशी भेटायला जायचे असल्याचे सांगून नेले. तर त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्याची व्हिडिओ आणि फोटो काढले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर वेळोवेळी आतापर्यंत त्यांच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच फिर्यादी याना मालमत्ता नावावर करून देण्यासाठी धमकावत व त्यांच्या व पतीच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. तर त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करत धमकावले आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2016 ते जून 2020 या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांनी वारंवार हा प्रकार घडत असल्याने कंटाळून त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली व त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

You might also like