Pune : तब्बल 28 दिवस व्हेंटिलेटर राहुनही 60 वर्षांच्या आजींनी केली ‘कोरोना’वर मात

शिक्रापुर : प्रतिनिधी –  तब्बल २८ दिवस व्हेंटिलेटर राहुनही डॉक्टरांनी अथक केलेल्या परिश्रमाने 60 वर्षांच्या आजींनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे.

याबाबत सविस्तर असे कि, शिरुर येथील दिपाली बोरा या आजींना कोरोनाला लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच कुटुंबियांनी तत्काळ शिरुर येथील श्रीगणेशा हॉस्पिटल येथे दाखल केले.यावेळी श्रीगणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर व डॉ.विशाल महाजन यांनी एक्स रे तपासुन उपचार सुरु केले. कोरोनाचा फुफ्फुसात संसर्ग जास्त असल्याने त्याचप्रमाणे कोरोनाबरोबर इतरही आजार असल्याने उपचारांसाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.तब्बल २८ दिवस व्हेंटिलेटर राहुनही डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ने घेतलेल्या अथक मेहनतीने आजींचे प्राण वाचले असुन आजींनी अखेर कोरोनावर मात केली.याबाबत बोलताना डॉ.अखिलेश राजुरकर यांनी सांगितले कि, हॉस्पिटल स्टाफ व कुटुंबियांचा आत्मविश्वास या मुळेच आजी ठणठणीत ब-या झाल्या आहे.या कामी श्रीगणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर,डॉ.विशाल महाजन,डॉ.सौरभ पाठक,डॉ.सारंग पाठक,डॉ.राजेंद्र ढोले, डॉ.विष्णु मोरे,नर्सिंग स्टाफ व सर्व कर्मचा-यांनी मेहनत घेतली.