Pune : आईस्क्रीम घेण्यास गेलेल्या 19 वर्षीय तरूणीसोबत 61 वर्षाच्या दुकान मालकानं केले अश्लील चाळे, पुण्यामधील कोथरूडच्या कर्वेनगर भागातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरुडच्या कर्वेनगर भागात आईस्क्रीम घेण्यास गेलेल्या 19 वर्षीय तरुणीसोबत 61 वर्षाच्या दुकान मालकाने अश्लील चाळे (obscene jokes ) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर तरुणीने नैराध्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, रात्री 10 वाजता हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी गौतम रामदास वैष्णव (वय 61) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विनयभंग व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात फिर्यादी राहतात. त्यांच्या घरा शेजारीच आरोपीची एक सुपर मार्केट सहवास नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांची 19 वर्षाची पिडीत मुलगी तीन दिवसांपूर्वी (दि. 28) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुपर मार्केटमध्ये आईस्क्रीम विकत घेण्यासाठी गेली होती.

यावेळी दुकान मालक गौतम याने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिला जवळ ओढून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणी घाबरली. ती पळत घरी निघून गेली. पण, तिला मानसिक धक्का बसला होता. या धोक्यातूनच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, कुटुंबाने पाहिल्यानंतर अनर्थ टळला. यानंतर तिला कुटुंबाने विचारले. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा ! बँकेनं नॉन-होम ब्रँचमधून कॅश काढण्याची ‘मर्यादा’ वाढवली, जाणून घ्या Limits

Flipkart वर ‘या’ 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन घरबसल्या जिंका ‘भरघोस’ बक्षिसे आणि मिळवा ‘डिस्काऊंट’ व्हाऊचर, जाणून घ्या प्रोसेस

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल